*कोलकाताने बंगळुरूला ८१ धावांनी केले पराभूत*
*शार्दुलसह केकेआरच्या फिरकीपटूंनी केला चमत्कार*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३च्या ९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ८१ धावांनी पराभव केला. यासह कोलकाताने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला, तर बंगळुरूला पहिला पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने सात विकेट्सवर २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर गारद झाला.
कोलकाताकडून शार्दुल ठाकूरने ६८, रहमानउल्ला गुरबाजने ५७ आणि रिंकू सिंगने ४६ धावा केल्या. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने चार, सुयश शर्माने तीन आणि सुनील नरेनने दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज, मायकेल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात कोलकाता आणि बंगळुरूचे सहा-सहा फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत.
फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्याचा निर्णय योग्य ठरला. जखमी रिस टोपलीच्या जागी खेळत असलेल्या डेव्हिड विलीने चौथ्या षटकात सलग दोन चेंडूंत व्यंकटेश अय्यर (३) आणि मनदीप सिंग (०) यांना बाद केले. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजने एका बाजूने धावा केल्या. त्याच्यामुळे पॉवरप्लेमध्ये कोलकाताची धावसंख्या दोन बाद ४७ अशी झाली. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार नितीश राणा (१) यालाही मायकल ब्रेसवेलने धावबाद केले. कोलकाताने १० षटकात ७९ धावा केल्या, त्यात गुरबाजच्या ५४ धावा होत्या. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांसह ३८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. १०.५ षटकांमध्ये कोलकातासाठी फक्त गुरबाजने चौकार लगावला. रिंकू सिंगने ११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला आणि चौकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. यादरम्यान आरसीबीच्या गोलंदाजांनी १६ अतिरिक्त धावा दिल्या, ज्या या आयपीएलमधील सर्वोच्च धावा आहेत.
गुरबाजला ५७ धावांवर कर्ण शर्माने बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याने आंद्रे रसेलची सर्वात मोठी विकेट घेतली. कोलकाताची धावसंख्या १२ षटकांत ५ बाद ९४ अशी होती. इथून शार्दुल ठाकूरने डावाची दिशा बदलली. त्याने आकाशशिपच्या १३व्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारून १९ धावा केल्या. ब्रेसवेलच्या १५व्या षटकात त्याने सलग दोन षटकार ठोकले. शार्दुल आणि रिंकूने २२ चेंडूत ५१ धावा जोडल्या, ज्यात शार्दुलने ४२ धावांचे योगदान दिले. त्याने केवळ २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या आयपीएलमधील बटलरसोबत हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. बटलरनेही २० चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. रिंकूने ३३ चेंडूत ४६ धावा काढून बाद होण्यापूर्वी १९व्या षटकात हर्षलला दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
शार्दुल ठाकूरचे २० चेंडूत आयपीएलचे पहिले अर्धशतक कोलकाता नाईट रायडर्सच्या डावासाठी संजीवनी ठरले. शार्दुल आणि रिंकू सिंग यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ चेंडूत १०३ धावांची भागीदारी करत कोलकात्याला ११.३ षटकात ५ बाद ८९ वरून ५ बाद २०४ धावांवर नेले. त्याने २९ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या आयपीएलमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक २३ अवांतर धावा दिल्या. कोलकाताने शेवटच्या आठ षटकांत ११० धावा केल्या.
२०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने यांनी चार षटकांत ४२ धावा जोडल्या. यानंतर सुनील नरेनने कोहलीला २१ धावांवर त्रिफळाचीत केले आणि पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्तीने डुप्लेसिसला तंबूत परत पाठवले. त्याने १२ चेंडूत २३ धावा केल्या. चक्रवर्तीने त्याच्या पुढच्या षटकात ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल यांनाही तंबूची दिशा दाखवली. त्यामुळे आरसीबी संघ अडचणीत आला.
पुढील षटकात सुनील नरेनने शाहबाज अहमदला तंबूमध्ये पाठवले आणि आरसीबीचा संघ ४४/० वरून ६१/५ पर्यंत पोहोचला. दिनेश कार्तिक आणि मायकेल ब्रेसवेल यांनी छोटी भागीदारी केली, पण शार्दुल ठाकूरने ब्रेसवेललाही १९ धावांवर बाद केले. ८३ धावांवर सहा विकेट्स गमावल्यानंतर, आरसीबीने अनुज रावतला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळपट्टीवर पाठवले, परंतु कोलकाताचा प्रभावशाली खेळाडू सुयश शर्माने त्याला एका धावेवर बाद केले. ८४ धावांत सात गडी बाद झाल्यानंतर आरसीबीचा पराभव निश्चित झाला. यानंतर दिनेश कार्तिकही नऊ धावा करून सुयश शर्माचा दुसरा बळी ठरला.
सुयशने कर्ण शर्माला आपला तिसरा बळी बनवला. यानंतर वरुण चक्रवर्तीने आकाश दीपला बाद करून चौथी विकेट घेतली आणि आरसीबीचा डाव १२३ धावांत गुंडाळला. यासह कोलकाताने हा सामना ८१ धावांनी जिंकला.
दरम्यान, आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी खुलासा केला की, रिस टोपली दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. टोपली मागील सामन्यात मैदानावर खांद्यावर पडल्याने त्याचा खांदा निखळला होता. तो परत इंग्लंडला जाणार आहे. तर जोश हेजलवुड १४ एप्रिलला ऑस्ट्रेलियाहून येत आहेत. तो १७ एप्रिलला होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. वानिंदू हसरंगा १० एप्रिलला न्यूझीलंडहून येत आहे.
शार्दुल ठाकूरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-