You are currently viewing कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळणार

कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळणार

आम.नितेश राणे यांच्या यांची संकल्पना; नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश

कणकवली

नवी मुंबई प्रमाणे कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळण्याची संधी आता मिळणार आहे.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून बंदिस्त मैदान केले जाणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश आले आहे.
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्यामधील जागेत अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीनुसार हे छोटेखानी मैदान उपलब्ध होणार आहे. त्याचे आम.नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. नवी मुंबई आणि इतर मोठ्या शहरात ज्या सुखसोयी आणि नवे उपक्रम राबविले जातात ते ते उपक्रम कणकवलीत आणि मतदार संघात आणण्याचा माझा प्रयत्न राहाणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंडु गांगण, सुशील पारकर, नगरसेवक विराज भोसले, अण्णा कोदे, रघुनाथ नाईक, आनंद पारकर, गौरांग खानविलकर आदी उपस्थित होते. अंडरआर्म क्रिक्रेट तसेच फुटबॉल प्रेमींना फावल्या वेळेत या जागी खेळाचा आनंद घेता येणार आहे. यासाठी दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूने सुरक्षेसाठी नेट लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे चेंडू नेट बाहेर जाणार नाही. याचा फायदा शहरातील क्रीडापटूंना होणार आहे.
आम. नितेश राणे म्हणाले, मला जगाच्या पाठीवर जे जे चागले वाटेल,ज्याची गरज माझ्या जनतेला वाटते आहे ती सेवा सुविधा कणकवली आणि मतदार संघात आणण्याचा प्रयत्न केला आहे.या छोटेखानी मैदानामुळे बंदिस्त का असेना मात्र अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळता येणार आहे.त्यामुळे ही व्यवस्था करून अजुन काही वेगळ्या खेळाची गरज लागली तरीही ती पूर्ण केली जाईल. भविष्यात असे अनेक उपक्रम आपण घेणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा