You are currently viewing गावाचा विकास करायचा असेल तर विकास कामांचा पाठपुरावा आवश्यक : आ. नितेश राणे

गावाचा विकास करायचा असेल तर विकास कामांचा पाठपुरावा आवश्यक : आ. नितेश राणे

देवगड

जर गावाचा विकास करायचं असेल तर प्रत्येक गावातील लोकांनी कार्यतत्पर राहणे गरजेचे आहे. आमच्याकडे निवेदन देऊन सोडून देणे असे न करता प्रत्येकाने निवेदनाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे मा.आमदार नितेश राणे यांनी वाडातर येतील कोनशीला शुभारंभ कार्यक्रम वेळी प्रतिपादन केले.

तरुण विकास मंडळ वाडातर, आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून वाडातर येते कोनशिला उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर बाळ खडपे, अमोल तेली, संजय तारकर, वैभव करंगुटकर, सुधीर जोशी, चंद्रकांत चोपडेकर, बाळकृष्ण जुवाटकर, लक्ष्मण जुवाट कर,विनायक जुवाटकर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,की माझ्या मतदारसंघात विकासकामे जोरदार चालू आहेत. सद्या आपली सत्ता असल्याने विकासकामांचा जोर हा असाच चालत राहणार फक्त कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत राहणे गरजेचं आहे. यावेळी सीताराम जुवाटकर व जयवंत वाडेकर यांचा खास गौवोद्गार यावेळी काढण्यात आले. यावेळी वाडीसाठी खास धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वान त्यानी यावेळी दिले. यावेळी सुधीर जोशी यांनी देखील आपल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाडेकर यांनी केले. तर आभार सुनिल वाडेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा