वेंगुर्ले
श्री हनुमान हे दैवत व्यायामपटूंचे आदराचे दैवत आहे म्हणूनच बलशाली शरीर व उत्तम आरोग्यासाठी श्री हनुमानाची आराधना केली जाते म्हणूनच श्री हनुमान जन्मदिना दिवशी वेंगुर्ले येथील सातेरी व्यायाम शाळा यांच्या शरीर सौष्ठवपटूनी दहा हजार जोर व बैठकां काढून हनुमानाला अभिषेक अर्पण केला उत्तम आरोग्य व निर्व्यसनी आणि बलशाली सुदृढ राहण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे असा संदेश यावेळी देण्यात आला.