You are currently viewing महाजवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण करा – विधाता सावंत

महाजवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण करा – विधाता सावंत

महाजवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण करा – विधाता सावंत

मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी…

वेंगुर्ला

वेंगुर्ला शहरातील महाजनवाडी रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. तसेच शहरातील मुख्य ओहोळावर पाणी अडविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे तातडीने बांध घालावेत, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विधाता सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाजनवाडीतील नागरीकांनी व शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील भटवाडी, महानजवाडी, साकव व सुंदरभाटले या मुख्य ओहोळांवर पाणी अडविण्यासाठी बंधारे घालण्याची मागणी केली आहे. यावर मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी माजी नगरसेवक कृतिका कुबल, मनिष परब, सिद्धेश मोरजकर, पूर्णिमा महाजन, मधुरा मोरजकर, खुशाल निरवडेकर, आनंद परब, कौस्तुभ मयेकर, तेजस कुडाळकर, उदय महाजन, भालचंद्र परब, सचिन मांजरेकर, अजय माणगांवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − one =