*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी जयराम धोंगडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हनुमंत राया*
बलोपासना आणि भक्ती
स्वामीनिष्ठा ज्याची शक्ती
युगात झाला तो लढवय्या
प्रणाम माझा हनुमंत राया!
अशक्य नव्हते तुजला काही
रिद्धी सिद्धी तुमच्या ठायी
विराजमान हृदयी रामराया
प्रणाम माझा हनुमंत राया!
अजरामर तू तिन्ही लोकी
राम कृपेचे वरदान डोकी
रघुकुलाची निस्सीम माया
प्रणाम माझा हनुमंत राया!
रुद्राचा तू अवतारधारी
भजती पुजती तुज नरनारी
राम दरबारी शोभे काया
प्रणाम माझा हनुमंत राया!
जयराम धोंगडे, नांदेड