मालवण
आपल्या जिल्हयातील मुले बुद्धिमान आहेत पण ती स्पर्धा परीक्षेत चमकताना दिसत नाही यासाठी कोकणातील मुलांनी या बाबत असलेला न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने सामोरी गेल्यास आपले गाव प्रशासकीय अधिकारयांचे गाव होण्यास वेळ लागणार नसल्याचे मत तिमिरातून तेजाकडे चे प्रणेते प्रशासकीय अधिकारी सत्यवान रेडकर यांनी त्रिंबक येथे व्यक्त केले.
कै शांताराम पवार यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त जनता विद्यामंदिर त्रिंबक आणि दत्ता पवार यांनी कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांबाबत माहिती देत मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत सकारात्मक निर्माण केली.
कार्यक्रमांची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ,मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, दत्ता पवार,त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे, त्रिंबक सोसायटी चेअरमन श्रीकांत बागवे,पोलीस पाटील सिताराम सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
तिमिरातूनी तेजाकडेचे प्रणेते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भूमिपुत्र सत्यवान रेडकर यांचे कोकणातील प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचा निर्धार करून, ‘तिमिरातूनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ राबविली आहे.भूतकाळातील गरिबी आणि त्यांना त्यावेळी न मिळालेले मार्गदर्शन आपल्या कोकणातील मुलांना मिळावे यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत. शैक्षणिक चळवळीचा फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रभर विस्तार त्यांनी केला. त्यांची 170हून अधिक व्याख्याने झाली आहेत. उच्चशिक्षित आणि ,केंद्र शासनाचे अधिकारी असूनही कोकणातील मुलांमधून प्रशासकीय अधिकारी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ज्ञानदानासारखे शैक्षणिक पवित्र कार्य ते करत आहेत. “ज्ञानदानाची समाजाला गरज आहे. जिल्ह्यामध्ये परिवर्तन केलेले पाहायचं आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले. उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना व्याख्यानाद्वारे अनमोल असे मार्गदर्शन त्यांनी केले.