You are currently viewing सावरकर गौरव यात्रेनिमित्त वेंगुर्ल्यात जागृती यात्रा

सावरकर गौरव यात्रेनिमित्त वेंगुर्ल्यात जागृती यात्रा

*सावरकर गौरव यात्रेनिमित्त वेंगुर्ल्यात जागृती यात्रा*

वेंगुर्ल्यातील सावरकर भक्तांनी शनिवार दिनांक आठ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता रामेश्वर मंदिर येथून सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन केले असून सदर यात्रेत वेंगुर्ला तालुक्यातील आबालवृद्ध स्त्री-पुरूष हिरीरीने सामील होणार आहेत. त्या दृष्टीने नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी माहितीयुक्त बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यात्रेचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक पाच एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता बिनीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून एका रॅलीचे आयोजन केले. योगायोगाने दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवासास एकटीच निघालेली व सतत पाच महिने अखंंड प्रवास करत असलेली सोनल अग्रवाल ही युवती त्याच दरम्यान वेंगुर्ल्यात दाखल झाल्यानंतर तिचे चारगदा मारुती मंदिरासमोरील चौकात भव्य स्वागत करण्यात आले.स्वागत आणि सत्काराने भारावलेपण घेवून सोनल पुढील प्रवासास रवाना झाली.

नंतर कार्यकर्त्यांनी मी सावरकर असे छापलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या परिधान करून प्रचार साहित्याचे वाटप करीत मारुती मंदिर ते दाभोली नाका, शिरोडा नाका, रामेश्वर मंदिर अशा मार्गाने समाप्त होऊन पुढे तिचे रूपांतर बैठ कीत करण्यात आले. मंत्री’राम मंदिरात ही बैठक संपन्न झाली. प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई , अरूण गोगटे , बागलकर सर , खवणेकर सर , अजित राऊळ सर , अँड.सुषमा प्रभु खानोलकर , आप्पा धोंंड , मंदार बागलकर , गिरीश फाटक , अभि वेंगुर्लेकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , दर्शेष पेठे , दिना आचार्य , वृंदा मोर्डेकर इ.नी बैठकीस मार्गदर्शन केले. या फेरीत महिलांचा उत्साही सहभाग असल्या बद्दल प्रत्ये काने कौतुकोद्गार काढले. या जागृती यात्रेमुळे शनिवार दिनांक आठ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सावरकर सन्मान यात्रेच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दृग्गोचर झाला.

यात्रेचाच एक भाग म्हणून उद्घोषण करण्याची जबाबदारी किरातच्या सीमा मराठे यांच्यावर सोपवण्यात आली.

ह.भ.प.संदीप माणके यांचे सावरकरांवरील अभ्यासपूर्ण कीर्तन हा कार्यक्रमाच्या शिरपेचातील तुराच ठरणार आहे. तर सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाकडून दिला जाणारा अल्पोपाहार हा कळस ठरणार आहे. असे उद्गार रामेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र परब यांनी काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा