You are currently viewing हिंदू धर्मावर संकटे येवू नयेत यासाठी जागृत रहा – निलेश राणे यांचे आवाहन

हिंदू धर्मावर संकटे येवू नयेत यासाठी जागृत रहा – निलेश राणे यांचे आवाहन

मालवण

हिंदू धर्मावर आलेली संकटे ही आज जरी दिसत नसली तरी ही संकटे कधी आणि कुठल्या दिशेने येतील हे सांगता येणार नाही. म्हणूनच प्रत्येकाने डोळे उघडे ठेऊन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जागता पहारा द्यावा असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी करून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वीर सावरकरांनी अनेक हाल अपेष्टा सोसल्या. वीर सावरकरांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे काम आपण सर्वांनी करूया त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादनही त्यांनी केले.

भाजपच्या वतीने राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून जिल्ह्यात या गौरव यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप शिवसेनेने मालवण कुडाळ मतदार संघात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणात भव्य सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेच्या सांगता कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, दत्ता सामंत, बबन शिंदे, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, धोंडी चिंदरकर आदी व इतर उपस्थित होते.

मालवण भरड नाका येथून सुरु झालेल्या भाजप शिवसेनेच्या वीर सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरव यात्रेत हजारो भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच सावरकर प्रेमी सहभागी झाले होते. या यात्रेत सहभागी झालेल्यांनी आपल्या डोकीवर ‘मी सावरकर’ अशा भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तर यात्रेत प्रत्येकाच्या हातात भाजप आणि शिवसेनेचे झेंडे होते. या यात्रेत मालवण कुडाळ मधील महिलांची लक्षनीय उपस्थिती होती. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजित निघालेल्या या सावरकर गौरव यात्रेत भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जय जयकार असो, वंदे मातरमच्या घोषणानी मालवणचा सारा आसमंत दुमदुमून निघाला

. या यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, शिवसेनेचे संजय आंग्रे, बबन शिंदे, दत्ता सामंत, अशोक सावंत, डॉ मिलींद कुलकर्णी, आनंद शिरवलकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, उमेश नेरुरकर, आबा हडकर, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, राजू राऊळ, अनिल न्हीवेकर, बबलू राऊत, महेंद्र चव्हाण, ललित चव्हाण, गौरव लुडबे, राकेश सावंत, जॉन नऱ्होना, प्रमोद करलकर, राजा गावकर, ममता वराडकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, आचरेकर, पूजा वेरलकर, माजी नगरसेविका स्नेहा आचरेकर, अशोक तोडणकर, निनाद बादेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, बंड्या सावंत, राजू राऊळ, शहर अध्यक्ष राकेश कांदे कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेचा विलास कुडाळकर नगरसेवक निलेश परब राजीव कुडाळकर नगरसेविका प्राजक्ता बांदेकर चांदणी कांबळी आदी व इतर उपस्थित होते

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, आज सावरकरां सारख्या महापुरुषाची वेगळी ओळख करून देण्याची गरज का पडली तर याला जबाबदार ढोंगी राहुल गांधी आहे. ढोंगी राहुल गांधी यांनी ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी वीर सावरकरांचा त्यांनी अपमान का केला हे राहुल गांधींनाही माहिती नाही. आपण काँग्रेस वाले आहोत आणि समोरचे आर. एस. एस वाले आहेत म्हणून शिव्या देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत असा आरोप करून निलेश राणे म्हणाले, राहुल गांधी हे गांधी नसून त्यांचे आडनाव बाटलीवाला आहे. राहुल गांधीचे आजोबा फिरोज बाटलीवाला म्हणून राहुल बाटलीवाला असे त्यांचे नाव आहे. गांधी घराण्याने देशाची वाट लावली असा गंभीर आरोपही निलेश राणे यांनी केला. मनीशंकर यांनी सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनीशंकर यांच्या प्रतिमेला चपलेने मारले होते. मात्र आज सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. त्यांचे सावरकर यांच्या विषयी असलेले प्रेम बेगडी असल्याची टिकाही त्यांनी केली. यावेळी निलेश राणे यांच्या हस्ते सागराचे पूजन करून सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी या गौरव यात्रेत संतोष मंडलिक यांनी वीर सावरकर यांची भूमिका वटवली होती तर चिमुकल्या सोहम गवाणकर याने सावरकर यांच्या जीवनावर आधारीत कथा सांगून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मिलिंद कुलकर्णी, राजन तेली, संजय आंग्रे यांची भाषणे झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा