You are currently viewing आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत बांदाकेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची चमक

आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत बांदाकेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची चमक

बांदा

मातृभूमी शिक्षण संस्था आयोजित शिवसंस्कार २०२३ या स्पर्धेत बांदा नं .१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करून विविध स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
मातृभूमी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराज यांचे विचार रुजावेत यासाठी महाराष्ट्र, गोवा ,गुजरात व कर्नाटक या च्या राज्यासाठी आंतरराज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला होता .या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना साखळी गोवा येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेटे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत गणोजी शिर्के यांची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आली.
या आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील इयत्ता दुसरीतील सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर या विद्यार्थ्याने पोवाडा गायन स्पर्धेत चारही राज्यातून प्रथम क्रमांक तसेच वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला प्राप्त केला होता, इयत्ता पाचवी शिकणाऱ्या नैतिक निलेश मोरजकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता तसेच इयत्ता चौथीतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता या यशस्वी विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना बांदा केंद्र शाळेचे शिक्षक वर्ग व पालकांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा