दोडामार्ग
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काही गावातील पायथ्याशी वावर असलेल्या हत्तींचा काही दिवसापासुन केर,मोर्ले गावामध्ये नुकसानी सह शेती बागायती मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरु होता.परंतु काल अचानक राञी १०च्या सुमारास हत्तींनी आपला मोर्चा वायंगणतडच्या दिशेने वळविला.केर मोर्लेतुन हे हत्ती घोटगेवाडी येथुन तिलारी नदी पाञातुन वायंगणतड गावात दाखल झाले.येथे येवुन त्यांनी नारळाची झाडे केळी बागायती सह भातशेतीची नासधूस केली सद्या पिकलेल्या नाचणी पिकांची हातातोंडाशी आलेली शेतीची नासधुस केली.त्यां नंतर या हत्तीचां प्रवास गावाकडून तालुक्याचे दिशेने सूरू झाल्यानें शेतकरी हतबल झाले असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे
वायगणतड गावातील लोकवस्ती पासुन अगदी जवळच्या अंतरावर हत्ती वावर असल्याने त्याठीकाणी ग्रामस्थांनी लगेचच धाव घेतली.बँटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता बिनधास्त उभे राहुन नाचणी शेती खाताना व नासधूस करतांना दिसुन आले.यावेळी ग्रामस्थांनी आरडा ओरडा सुरु केला परंतु हत्ती माञ जागेवर स्थिर राहिले होते .काही वेळाने त्यांनी तिथुन बाजूला गेल्याने वनविभागाचे कर्मचारी याठिकाणी हजर झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पळवुन लावण्यास सुरुवात केली.असता घोटगेवाडीच्या दिशेने रवाना झाले.परंतु गावावस्ती पासुन जवळच असणार्या शेतीत आल्याने ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षापुर्वी असेच हत्ती वायंगणतड येथे दाखल झाले होते.परंतु आता वर्ष उलटुन गेल्याने हत्तीचा कोणताही उपद्रव याठिकाणी नव्हता परंतु पुन्हा हत्ती हजर झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास आता शेतकर्यांच्या तोंडुन हत्ती काढुन घेणार की काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडला तर यावर वनविभागाने तोडगा काढुन कायमस्वरुपी हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गात कडुन होत आहे.