You are currently viewing ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

शिवसेना नेते संदेश पारकर यांची यशस्वी शिष्टाई

सावंतवाडी

तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या दोन उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी सुद्धा या उपोषणाला उपस्थिती लावून उपोषणावर मध्यस्थी करून तोडगा काढण्यात आला.

पारकर म्हणाले की, इन्सुली ग्रामस्थांनी आज जन उपोषण छेडलेल होत. मी या उपोषणाला भेट देऊन सर्व ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले. त्याचबरोबर परिवहन विभागाच्या अधिकारी आणि डंपर व्यावसायिकांची सुद्धा चर्चा केली आहे सर्वांचा विचार करून सामंजसपणाने मार्ग काढण्यात आला. तसेच उपोषणकर्त्यांचे जे मागणी होती. त्यावर कारवाई करण्याची भूमिका परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे उपोषण पुन्हा करावा लागणार नाही अशी भूमिका अधिकाऱ्यानी घेतलेली आहे. सर्व ग्रामस्थ आणि डंपर व्यवसायिकांची चर्चा करून एक सामंजसाचा मार्ग काढलेला आहे. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी चर्चा करून विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली केलेलं उपोषण मागे घेण्यात आला आहे. नक्कीच या प्रकारावर प्रशासन तोडगा काढेल आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की यातून सर्वजण या त्रासातून मुक्त होतील, असे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा