You are currently viewing येत्या आठ दिवसांत तिराळी ते तेरवणमेढे पर्यंतच्या रस्त्याचे व मोऱ्यांचे नुतनीकरण न केल्यास ११ एप्रिल रोजी उपोषणाला बसणार..

येत्या आठ दिवसांत तिराळी ते तेरवणमेढे पर्यंतच्या रस्त्याचे व मोऱ्यांचे नुतनीकरण न केल्यास ११ एप्रिल रोजी उपोषणाला बसणार..

मदन राणे, संदेश वरक व संदेश राणे यांचे बांधकाम विभागाला लेखी निवेदन..

दोडामार्ग

तिराळी ते तेरवणमेढे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस पुर्णपणे धोकादायक बनलेला आसुन या महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकाना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा निवेदने देवुनही तसेच उपोषणही करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे जाणीव पुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तसेच कोनाळकट्टा ते विजघर या रस्त्यावरील मोऱ्या पुर्णता निकामी झालेल्या असुन, त्या मोऱ्या अपघातास निमंत्रन देत आहे. त्याकडे पण सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठ दिवसाच्या आत रस्त्याचे नूतणीकरण तसेच मोऱ्याचे नुतणीकरण न केल्यास मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी तेरवणमेढे या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन युवा सेनेचे तालुका प्रमुख मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे व शिवसैनिक संदेश वरक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
तसेच उपोषणावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे देखील त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा