You are currently viewing सामाजिक समता या कार्याक्रमाचे 1 ते 30 एप्रिल कालावधीत आयोजन

सामाजिक समता या कार्याक्रमाचे 1 ते 30 एप्रिल कालावधीत आयोजन

सामाजिक समता या कार्याक्रमाचे 1 ते 30 एप्रिल कालावधीत आयोजन

– सहायक आयुक्त संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी, 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जिल्ह्यामध्ये दि. 01 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिम, निबंध स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, आरोग्य शिबिर, सामाजिक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रसिध्दी मान्यवरांची भाषणे, संविधान जागर आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.

            अनुसूचित जाती, सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती. वंचित दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना समाजकल्याण विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच वसतिगृह आश्रमशाळा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा