कुडाळ / माणगाव :
माणगाव धरणवाडी रस्त्याच्या संदर्भात माणगाव धरणवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलन स्थळी दोन तास होऊनही कोणीही प्रशासकीय अधिकारी न फिरकल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री रणजीत देसाई आक्रमक झाले. त्यानंतर उशिरा दाखल झालेल्या पंचायत समिती कुडाळ चे ग्रामविस्तार अधिकारी श्री अरोसकर यांना जाब विचारत धारेवर धरले व त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला आवश्यक उत्तरे न मिळाल्याने आक्रमक झालेले आंदोलक यांनी निषेध व्यक्त केला. तर रुपेश कानडे यांनी ग्रामसेवक श्री सावंत यांना आपण या रस्त्यासंदर्भात कोणकोणती माहिती उपलब्ध केली आहे. यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोण कोणती कामे झाली आहेत आणि सदर माहिती देणे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपलं काम असताना आपण त्यांना योग्य तो सल्ला का देत नाहीत. आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता का केली जात नाही असे प्रश्न विचारले. यावेळी सरपंच सौ. भोसले मॅडम यांनी आपण नवीन असून वरिष्ठांकडून त्याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ व येत्या आठ दिवसात कागदपत्रांची पूर्तता करून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, विनायक राणे, राजा धुरी, रुपेश कानडे, पप्या तवटे, जोसेफ डान्टास दीपक काणेकर, सचिन परब केशव भर्तू, दीपक वारंग, पांडुरंग वारंग, अनिल वारंग, उपस्थित होते.