सावंतवाडी
जगभरातील लोकांच्या तणावाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक दशकात जागतिक पातळीवर तणावाची पातळी 12.7 टक्के म्हणजेच 13 टक्क्यांनी वाढत आहे व त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होत आहे. याकरिता संगीतोपचार हा उत्तम व परिणामकारक उपचार आहे. संगीतामुळे भावनांचे पोषण होते आणि भावना आणि विचारांवर’ नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजेच मन शांत ठेवण्यासाठी संगीतोपचाराचा उपयोग होतो ,संगीताने मानसिक अवस्थेत सकारात्मक बदल घडून येतात त्यामुळे इतर उपचार पद्धतीप्रमाणे सहाय्यक उपचार पद्धती म्हणून संगीतोपचाराचा वापर आवश्यक आहे , असे विचार संगीतोपचार तज्ज्ञ. सौ श्रीया रवींद्र भागवत यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले . जेष्ठ प्रसिद्ध साहित्यिक कै . विद्याधर भागवत यांच्या रवीवर्षा ,श्रमविहार सोसायटी या निवासस्थानी झालेल्या “संगीतोपचार जागृकता “वर्गात त्या बोलत होत्या. संगीताचा मेंदूवर कसा सकारात्मक परिणाम होतो आणि सर्व मानसिक आणि शारीरिक रोगावर संगीताच्या सहाय्याने आपण कसे उपचार करू शकतो याबद्दल त्यांनी विस्तृत विश्लेषण केले. दीड तास झालेल्या सत्राचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला . .हि प्रथमच माहिती कळली… असे उपचार असतात हे माहीत नव्हते . चांगला उपक्रम आहे असे काही श्रोत्यांनी मत व्यक्त केले .
सत्राच्या शेवटी श्री बाळ पुराणिक यांनी संगीतोपचार जागृकता अधिक वाढवण्यासाठी रोटरी क्लब ,लायन्स क्लब , जेष्ठ नागरिक संघ किंवा अन्य सामाजिक संस्थाच्या सहकार्याने विविध ठिकाणी असे वर्ग घेणार असल्याचे सांगितले तसेच याच ठिकाणी भविष्यात *म्युझिक थेरपी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.*
या कार्यक्रमाला डॉ अमृता स्वार , सुहासिनी तळेगांवकर, श्री सडेकर , प्रा. केदार म्हसकर, श्री हनुमंत सावंत सर , श्री विजय माधव , सौ मीना उकिडवे , सौ खानोलकर, सौ वैभवी पुराणिक, श्री मुंडले सर , श्री सुधीर जडये , सौ ईश्वरी तेजम , श्री प्रसाद मराठे, श्री मेस्त्री इत्यादी उपस्थित होते ..
कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला