देवगड
तरुण विकास मंडळ वाडातर आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा बुधवार दिनांक ५ एप्रिल ते शनिवार ८ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले आहे गुरुवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता मंदिराचा कोनशीला उद्घाटन समारंभ माननीय आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १० वा. होम हवन, लघुरुद्रभिषेक. सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धा, रात्री १०.३० वा. नाडण शाळा नंबर एक व स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ५ वा.प्रवचन, प्रवचनकार ह. भ .प .श्री गिरीश कोरगावकर ,महाराज मुंबई, सकाळी ६.३१ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा महापूजा व आरती दर्शन, सकाळी १०. वा. मंदिराचा कोनशीला उद्घाटन समारंभ, उद्घाटक आमदार श्री नितेश राणे, दुपारी १२ वा. पासून महाप्रसाद, साय.४ वा. श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक, रात्री ९ वा. गाऱ्हाणी, रात्री १०. वा. तरुण उस्ताही मंडळ पालये गुंगारा आणि बाबल्याचो बापूस नाटिका . शुक्रवार दिनांक ७ एप्रिल साय.४ वा. महिलांचा हळीकुंकू कार्यक्रम, साय.९ वा. सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा, रात्री १० वा. दशावतार महिमा भक्तीचा, शनिवार ८ एप्रिल साय.४ वा. श्री सत्यनरायण महापूजा व आरती दर्शन, रात्री १०. वा. तिरंगी भजनांचा जंगी सामना. प्रविण सुतार (पुरळ), बुवा संदिप पुजारे ( नाडण), हेमंत लाड ( मालवण).
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तरुण विकास मंडळ वाडातर यांनी केले आहे.