You are currently viewing राजस्थान मधील घटनेवरून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा आक्रमक – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 

राजस्थान मधील घटनेवरून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा आक्रमक – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 

मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी…

सिंधुदुर्गनगरी

राजस्थान मध्ये दलित समाजातील विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्गने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच १५ दिवसात योग्यती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

राजस्थान मध्ये ८ वर्षीय इंद्रकुमार मेघवाल या दलित मुलाला माठातील पाणी पिल्याने जातीय रागातून शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात त्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून दलित समाजातील नागरिकांवर वारंवार असेच अन्याय होत आहेत. याकडे राजस्थान मधील काँग्रेस सरकार काहीही करत नसल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्गने राजस्थान सरकारचा निषेध केला आहे. तसेच आज अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेत निवेदन सादर करत राजस्थान मध्ये दलित समाजातील विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल याचा मारहाण करून जीव घेणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावीं अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे प्रभारी चंद्रकांत जाधव, अंकुश जाधव, चंद्रकांत वालावलकर, गुणाजी जाधव, मंगेश पावसकर पुंडलिक जाधव, अशोक कांबळे,अजित तांबे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − four =