कनेडी कार्यालयामध्ये युवासेनेची बैठक संपन्न
कणकवली
कनेडी हरकूळ विभागा ची युवासेनेची बैठक संपन्न झाली. युवासेनेच्या वतीने आज रक्तदरवाढी निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. कनेडी पंचक्रोशीतुन आज युवासेनेच्या वतीने “रक्त दरवाढी” निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाला १५० युवासैनिक जाणार आहेत.
कनेडी पंचक्रोशीतुन आज युवासेनेच्या मोर्चाला मोठ्या संख्येने युवक सहभागी होतील असा दावा कनेडी उप तालुका प्रमुख राजू पाटील आणि युवासेना संघटक मुकेश सावंत यांनी दिला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना पदाधिकारी दिनेश वाळके, संदीप गांवकर, विजय गांवकर, तुषार गांवकर,कुणाल सावंत, संतोष सावंत,रासंम , प्रशांत लाड , सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य सरपंच आदी सर्व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.