सावरकर लिखित पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, क्रांती गीते,हिंदू गौरव गिते होणार सादर
कणकवली
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेशजी राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेशजी राणे यांनी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या सहकार्याने भव्य रंगमंचावर सावरकर लिखीत पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, क्रांती गीते, हिंदु गौरव गीते यावर आधारित “सावरकर गौरव ” हा कार्यक्रम कणकवली शिवाजी चौक येथे सादर होणार आहे. सावरकर प्रतिष्ठान चे नामवंत कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. सावरकरांचे राष्ट्रवादी विचार, हिंदु तत्वज्ञान घरा घरात पोहचावे हेच या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे.