You are currently viewing वेंगुर्लेतील मारुती स्टॉप मंदिरात ‘हनुमान जयंती उत्सवास’ प्रारंभ

वेंगुर्लेतील मारुती स्टॉप मंदिरात ‘हनुमान जयंती उत्सवास’ प्रारंभ

वेंगुर्ले :

 

वेंगुर्लेतील मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात २ ते ६ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक हनुमान जयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमां सोबतच दशावतारी नाटके, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ असे विविध कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. पहिल्या दिवशी आकर्षक श्री नागवेलीच्या पानांची पूजा बांधण्यात आली होती. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

काल रामेश्वर द.ना मंडळाचे ‘गरुड गर्वहरण’ हे नाटक सादर करण्यात आले होते. तर आज दि.३ रोजी सायं.७ वा. दत्त माऊली द.ना.मंडळाचे ‘कुक्कुटेश्वर महिमा’ हे नाटक, दि.४ रोजी सायं.७ वा.वावळेश्वर द.ना.मंडळाचे ‘स्त्री वेशधारी गणेश’ हे नाटक, दि.५ रोजी ‘सीता हरण’ हा कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, दि.६ रोजी पहाटे ४.३० वा. मारुतीची पूजा व अभिषेक, पहाटे ५ वा.ह.भ.प.डॉ.रमेश पाटकर यांचे सुश्राव्य किर्तन, ६ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायं.५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, सायं.७ वा.आजगांवकर द.ना.मंडळाचे ‘वृषकपी’ हे नाटक होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा