You are currently viewing निसर्गदान

निसर्गदान

*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखिका कवयित्री सौ.मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*निसर्गदान*

नुकताच चैत्र महिना सुरू झाला, वृक्षांनाही पालवी दिसू लागली आहे. मनांतही उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा अशी या महिन्याची महती. परिक्षांचा काळ डोळ्यांसमोर असूनही विद्यार्थी वर्गाचे सुट्टीनियोजन सुरू होते. कडकडीत उन्हाळ्यातला प्रवासही, सुट्टीतला असा सुखद अनुभव ज्याची वर्षभर प्रत्येकजण वाट पहात असतो. आयुष्यांतील मधल्या टप्प्यावर असणारी आमची पिढी जिला बालपणीची सुखाची सुट्टी अनुभवता आली. अनेक नात्यांनी समृद्ध अशी गृह्व्यवस्था पहायला मिळाली. मन भरेपर्यंत हिंडता-फिरता आले, दंगामस्ती करता आली. उन्हाच्या आधी सकाळच्या वेळी व संध्याकाळी अनेक खेळ रंगायचे. दुपारच्या वेळी झाडांच्या सावलीतील बैठे खेळ. कुटुंबांतील महिलावर्ग एकत्र आल्याने वेगवेगळ्या चवींचे पदार्थ पानांत असायचे. घरांतील वडील मंडळींसमोर पालकांच्या शिस्तीतही थोडा सैलसरपणा असायचा.
ग्रामीण भागांतील वास्तव्य, भर दुपारी येणारा गारेगारवाला हे विश्वच वेगळे. ऊन सरकेल तसे कौलारू घरांत दिसणारे कवडसे. या सगळ्यामुळे आजही मन निसर्गसान्निध्यांत रममाण होते. मुख्य म्हणजे पुस्तके वाचताना कोणतीही आसनव्यवस्था चालायची अगदी घरांतील खांबांना टेकून बसून केलेले वाचन आजही आठवते. दुपारची ती शांतता आणि वाचनालायातून आणलेली पुस्तके असा हा ठेवा होता. इंग्रजी शब्दांचे पाठांतर, वाक्प्रचार, म्हणी यांची माहिती करून घेणे हे तर इयत्ता पाचवी पासूनचे. दर सुट्टीतील हा थोडासा अभ्यास पण आज सगळीकडे वावरताना याचे किती महत्व आहे हे लक्षांत येते. घरांघरांमधील हळदीकुंकू समारंभ, चैत्र गौरींची आरास, लग्नसमारंभ किंवा इतर कार्यानिमित्त जमलेले नातेवाईक, आपुलकीने होणारी चौकशी, कधी कधी मनांत अढी ठेवून वागणारे असे सर्वच अनुभवायला मिळायचे. जूनमध्ये शाळा सुरू होईपर्यंत ही सगळी धमाल चालायची.
परगांवाहून येणाऱ्या लेकी-सुनांचे, नातवंडांचे कौतुक करताना आजी-आजोबा थकत नव्हते. आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत, ही जाणीव मात्र नोकरीनिमित्त इतर शहरांत राहणाऱ्या त्यांच्या मुलांना होती. पुरूषमंडळीही थोडी सुट्टी काढून विश्रांती घेत, कुटुंबासमवेत विरंगुळ्याचे क्षण शोधत, हास्यविनोद, नित्यवास्तव्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या अनुभवांतून एक वेगळ्या प्रकारची शिकवण मिळायची. परसदार फळाफुलांनी लगडलेले असायचे. भोजन व्यवस्थेत पंगत एक लहान मुलांची, पुरुषांची आणि मग बायकांची. पैशाचा ओघ कमी असला तरीही वयोवृद्ध माणसे आल्यागेल्याचे चांगल्या प्रकारे स्वागत करीत. मनाचा मोठेपणा, वैचारिक आत्मियतेने ऋणानुबंध समृद्ध होत असे. नुसतेच कुटुंब नव्हे तर शेजारी-पाजारी व गल्लीतील सर्वचजण संध्याकाळी एकत्र येत. घरांसमोरील कट्टा किंवा अंगण फुलून जायचे. पत्र लेखनातून ख्याली-खुशाली समजण्याचे दिवस होते ते, म्हणूनच प्रत्यक्ष भेटींची ओढ निखळ असायची.
काही दिवसांच्या वास्तव्यानंतर परतीचे वेध लागायचे, शालेय निकालानंतर पुढच्या इयत्तेची उत्सुकता प्रचंड असायची. थोड्या विश्रांती नंतर महिला वर्गात आपापल्या संसारांत परतायचे बेत सुरू व्हायचे. या सगळ्यांत आजी-आजोबांनी दिलेल्या अनेक भेटवस्तूंचा आणि खाऊचा समावेश असायचा. दाटल्या डोळ्यांनी, भरल्या मनाने ही घरांतील मोठी माणसे निरोप द्यायची, गल्ली ओलांडून पुढे जाईपर्यंत हात हलवत रहायची. घरी परतताच नवीन पुस्तके, वह्या त्यांना कव्हर घालणे ही कामे उरकली जायची, रेनकोट, छत्र्या, नवीन युनिफॉर्म यांच्या जमवाजमवीला सुरवात केली जायची. टेलिव्हिजनचे झालेले नुकतेच आगमन ते पण एक आकर्षण होतेच. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मात्र वर्षभर मन ताजेतवाने ठेवायचा. एप्रिल-मे महिना संपताच वातावरणात बदल घडत पावसाळ्याची सुरवांत. पहिला पाऊस आजही सुखाचाच, मात्र हे निसर्गदान आपल्याला आता जपता आले पाहिजे. टपोऱ्या थेंबांनी तृप्त होणारी धरणी आणि आसमंतात निर्माण होणारा गारवा सर्वच विलोभनीय आहे.

मेघनुश्री, कोल्हापूर
लेखिका, ग्रामीण पत्रकार
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा