इचलकरंजी : प्रतिनिधी
पारदर्शी कारभार व सभासदांचे हित जोपासत सहकार क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या येथील श्री शाहू काॅर्नर सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.तसेच संस्थेच्या चेअरमनपदी युवराज लायकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन,माजी नगरसेवक जयवंतराव लायकर , सामाजिक कार्यकर्ते रणजीत लायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वस्ञनगरीत सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने १९८७ साली श्री शाहू सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली.आजतागायत या संस्थेने पारदर्शी कारभार व सभासदांचे हित जोपासत यशाची चढती कमान ठेवली आहे.त्यामुळे या संस्थेवरील
सभासद व ठेवीदारांचा विश्वास कायम राहिला आहे.नुकताच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी युवराज लायकर तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ माने यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी संचालक संजय शेलार , रणजीत लायकर , युवराज लायकर , विठ्ठल येसाटे , महावीर बेडक्याळे, विश्वनाथ माने ,सौ.स्नेहा आसबे ,सौ.संगिता सावंत ,मदन शेटके ,कईम मुजावर , श्रीकांत हांडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थापक चेअरमन जयवंतराव लायकर , सामाजिक कार्यकर्ते रणजीत लायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच हातकणंगले तालुका सहकार उपनिबंधक विभागाचे बी.के.पाटील , मधुकर सिंदी , दीपक लाखन , वासुदेव कोष्टी यांचे मोठे सहकार्य लाभले.सदर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांसह नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.