सलग चौथ्या वर्षी यश; तर इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात तिसरा…
वैभववाडी
दत्त वि.मं.वैभववाडी शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी आयुष प्रदीप नाळे यांने सलग चोथ्या वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवून ऑल इंडिया रँक सुवर्ण पदक मिळवून स्कॉलरशीप प्राप्त केली आहे. ही परीक्षा जानेवारी २०२३ ला घेण्यात आली होती.
तसेच इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत २०० पैकी १८४ गुण मिळवून आयुषने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कु.आयुषला सौ.मनिषा सरकटे, सौ.मेघा नाळे, श्री.पाडदेवाड, श्रीम.सावंत, सौ.दीप्ती पाटील, सौ.कुडतरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्द लगटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे, शा. पो. आ. अशिक्षक श्री.अशोक वडर, केंद्रप्रमुख श्री रामचंद्र जाधव, शा.व्य.समिती यांनी कु.आयुषचे अभिनंदन केले.