कणकवली
कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या सरपंच सुजाता
सावंत यांच्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला बडतर्फीचा निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अंशतः बदल करून कायम ठेवला आहे. त्यामुळे सुजाता सावंत यांना सरपंच पदासह सदस्य पदावरून देखील अपात्र केले आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांकडून पारित करण्यात आल्याने, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांना हा धक्का मानला जात आहे. सतीश सावंत यांच्या समर्थक असलेल्या भिरवंडे ग्रामपंचायतच्या पदच्युत सरपंच सुजाता संतोष सावंत यांचे अपील ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी फेटाळले आहे. त्यामुळे पदच्युत सरपंच सुजाता सावंत यांची सरपंच
पदावरून बडतर्फी कायम झाली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांना सरपंच पदावरून बडतर्फ केले होते. या निर्णयाविरोधात सुजाता सावंत यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील केले होते. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पदच्युत सरपंच सुजाता सावंत यांचे अपील वर निर्णय देताना त्यांना सरपंच
पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच सरपंच पदासोबत सदस्य पदावरूनही त्यांना अपात्र करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत.