You are currently viewing जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग स्थानिक शिक्षक भरती बेमुदत उपोषण स्थळी जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळाने दिली भेट

जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग स्थानिक शिक्षक भरती बेमुदत उपोषण स्थळी जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळाने दिली भेट

ओरोस

जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग स्थानिक शिक्षक भरती बेमुदत उपोषण ठिकाणी जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले,मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये गेले पाच दिवस शिक्षक भरतीसाठी आमरण उपोषण चालू असताना शिक्षण मंत्र्यांनी त्याची साधी दखल घेऊ नये हे खरोखरच जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींचे दुर्दैव आहे. माझी सन्माननीय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अशी विनंती आहे की आपण या उपोषणकर्त्या डि.एड. बेरोजगार युवक युवतींची प्रत्यक्ष भेट देऊन म्हणणे ऐकून घ्यावे आणि महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री म्हणून प्रामाणिकपणे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश किर यांनी डी.एड. बेरोजगारांचे प्रश्न समजावून घेतले आणि राज्यपातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण,प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, देवानंद लुडबे, रत्नागिरी काँग्रेसचे अ‍ॅड. सदानंद गांगण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा