You are currently viewing ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात साजरा होणार कोकणचे सुपुत्र तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस

‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात साजरा होणार कोकणचे सुपुत्र तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस

ओरोस :

 

केंद्रीय मंत्री तथा कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचा ७० वा वाढदिवस,१० एप्रिल २०२२ रोजी भाजप सिंधुदुर्ग आणि भाजप युवानेते विशाल परब मित्रमंडळातर्फे ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात साजरा होणार आहे. जिल्ह्यात भाजप सिंधुदुर्ग आणि भाजप युवानेते विशाल परब मित्रमंडळातर्फे शाळा, सामाजिक संस्था, आश्रम येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा होईल. तर उद्या सिंधुदुर्गनगरी येथील शरद भवन येथे संध्याकाळी ठीक ४.३० वाजता कोकणचे सुपुत्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विशेष वाढदिवस सोहळा आयोजित केला आहे.

त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे नेते विशाल परब, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, देवेन सामंत, संतोष वालावलकर, पांडुरंग मालवणकर आदी उपस्थित होते.

भाजपच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ते कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहे. तसेच रक्तदान शिबिर, फळ वाटप, निराधारांना मदत आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ एप्रिल भाजपा स्थापना दिन यानिमित्त पंधरावडा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून काही कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

तसेच यावेळी राज्यातील भाजप नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, भाजप राज्य सरचिटणीस निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित असतील. यानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील शरद भवनच्या हॉलचा आज सकाळी जिल्ह्याचे भाजप नेते आणि युवानेते विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आढावा घेतला.

उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिनास जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा