You are currently viewing भात शेतकऱ्यांना बोनस आणि भात खरेदी २६ कोटी २५ लाख रक्कम मिळणार – अतुल काळसेकर 

भात शेतकऱ्यांना बोनस आणि भात खरेदी २६ कोटी २५ लाख रक्कम मिळणार – अतुल काळसेकर 

२०१७ मधील खावटी कर्ज माफी मिळणार…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतकऱ्यांनी शासनाने १ लाख ६२२ क्विंटल भात खरेदी केली होती.भात खरेदी बोनस आणि भात खरेदीची रक्कम २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये आज रात्री १२ वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खाती जमा होणार आहे.यासाठी भाजपा आ.नितेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्याबाबतचा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी युती सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर २०१७ मधील खावटी कर्ज माफी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कणकवली शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या काही वर्षंपासून भात खरेदी केली जाते.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीचे ई पीक पाहणी करत भात खरेदी केंद्रांवर नोंद केली.त्या शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात ५ कोटी ७३ लाख २० हजार ६१० रुपये आणि भात विक्रीचे २० कोटी ५२ लाख ६९ हजार ३९० रुपये एकूण २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये ५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यास आम्हाला संपर्क साधावा.याबाबत आ.नितेश राणेंनी विधानसभेत आवाज उठवला तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष देवून हा निर्णय घेतला आहे.भाजपचे सरकार असताना १२ रुपये दर आहे.त्या काळात भात खरेदी दर अत्यल्प आहे,खासगी व्यापारी कौवडीमोल दराने करत होते.त्यानंतर १२,१६,१९ रुपये होत होती.महाविकास आघाडीने १७ रुपये दराने खरेदी करत बोनस देतो सांगितले होते.त्यांना देता आला नाही,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करूनही पैसे जमा केले नाहीत,असा टोला अतुल काळसेकर यांनी लगावला.भात शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार बोनस स्वरूपात मिळणार आहेत.सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना २ हेक्टर क्षेत्र असेलल्या लाभ मिळणार आहे.

खावटी कर्जमाफी देण्याबाबत निर्णय लवकरच होणार आहे.२०१७ सालातील थकित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आता युती सरकारने विशेष तरतूद केल्याने काजू बागायतदार यांना दिलासा मिळणार आहे.जीआय मानकन याबद्दल तरतूद करण्यात आली आहे.येत्या काही काळात काजू बोंडू वर इथेलॉन निर्मिती करण्यात येईल.जागतिक बाजारपेठेत काजू दर चढउतार बागायतदार यांना दराबाबत तोटा सहन करावा लागेल.याबाबत काही निर्णय घेतला जाईल,असे अतुल काळसेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा