You are currently viewing बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा

कुडाळ

क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 24 मार्च हा दिन जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो .या दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, कुडाळ व जिल्हा क्षयरोग कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 मार्च 2023 रोजी जनजागृती पर फेरी व पथनाट्य सादर करण्यात आले . जनजागृती पर फेरीची सुरुवात ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथून करण्यात आली व पंचायत समिती कुडाळ येथे सांगता करण्यात आली.

जनजागृती फेरीचा शुभारंभ डॉक्टर सई धूरी यांच्या हस्ते करण्यात आला .या फेरीमध्ये- क्षयरोग होऊ शकतो बरा त्यावर त्वरित उपचार करा, तसेच जन जन को जगाना है टी. बी को हराना है. अशी विविध घोषवाक्य देऊन जनजागृती करण्यात आली.तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेरूर देऊळवाडा व पिंगुळी म्हापसेकर तिठा या ठिकाणी क्षयरोग जनजागृती पर पथनाट्य सादर केलेया क्षयरोग जनजागृती मोहिमेसाठी सौ मीना जोशी प्राचार्य बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग ,सौ.कल्पना भंडारी, उपप्राचार्य बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग, प्रा. प्रथमेश हरमलकर, प्रा. वैजयंती नर, प्रा.नेहा महाले, डॉ. हर्षल जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रमेश करतसकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर सई धुरी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी श्री लक्ष्मण कदम, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक श्री सुरेश मोरजकर, क्षयरोग पर्यवेक्षक श्री सिद्धेश राणे, रोग पर्यवेक्षक श्री शीला आंब्रे ,क्षयरोग पर्यवेक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर यांचे आरोग्य कर्मचारी सी एच ओ आशा स्वयंसेवीका इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा