You are currently viewing आधार व पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात मनसे आक्रमक

आधार व पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात मनसे आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करून करणार वसुली धोरणाचा निषेध

मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे

सिंधुदुर्ग

ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर 2022 पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 हजार रुपये दंड आकारणी सुरू केली आहे आणि 31 मार्च 2023 पर्यन्त लिंक न केल्यास इनकम टॅक्स कायदा कलम 272 B नुसार 10 हजार दंड आकारणी करण्याबाबत सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. याशिवाय दंड न भरणाऱ्यांचे पॅन कार्ड रद्द करण्याचा इशारा देखील आयकर विभागाकडून देण्यात आला आहे. सरकारचे हे वसुली धोरण जाचक असून सर्व सामान्यांची आर्थिक पिळवणूक करणारे आहे. वास्तविक शासनाकडे नागरिकांचा सर्व डाटा उपलब्ध असताना आवश्यक कार्यवाही करणारे अभिप्रेत असताना शासन स्वतः जबाबदारी झटकून दंड जनतेच्या माथी मारण्याचे कुटील कारस्थान करत आहे.महाराष्ट्र सैनिक या दंड वसुलीचा निषेध दर्शवण्यासाठी येत्या सोमवार दि 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करत जनतेचा आक्रोश शासनापर्यंत पोहचवणार असल्याची माहिती मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा