You are currently viewing ती महिला मानसिक तणावाखाली…

ती महिला मानसिक तणावाखाली…

*जुगाराचा बादशहा चे अनेक प्रताप*

खेळ कोणताही असो एकदा का माणूस अवैध खेळात वा धंद्यात गेला की त्याला त्याची सजा ही मिळतेच.. गैरधंदे करणारे दुसऱ्यांचा वापर करून घेण्यात माहिर असतात. जुगार खेळायला गेलेल्या… त्याच्या बाबतही असेच झाले. गैरधंदे करणाऱ्या जुगाराच्या बादशहाच्या फोनवरून स्वतःच्या बायकोला फोन लावला काय आणि त्या जुगाराच्या बादशाहने म्हणजे दात पडक्या आप्पाने त्याच्या बायकोला मेसेज, फोन करून, रात्री अपरात्री अश्लील व्हिडीओ पाठवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नादी लावण्याचा प्रकार सुरू केला. तिच्याशी झालेले संभाषण रेकॉर्ड करून तिचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे दाखवत तिला मानसिक त्रास देण्याचा प्रकार पैशांच्या जोरावर दात पडक्या आप्पाने सुरू केला आहे.

दात पडक्या आप्पा दारू आणि जुगाराचे गैरकानुनी धंदे करतो, त्यामुळे त्याच्याकडे पैशांची कमी नाही. आपल्या गैरधंद्यातील मित्रांना पुढे करून दात पडक्या आप्पा त्या महिलेच्या पतीला धमकावत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तिचे कॉल रेकॉर्ड केलेले असून तिची बदनामी करण्याचे सांगत असून भलत्याच महिलेचा आवाज दात पडक्या आप्पा ऐकवून दाखवत आहे. फळविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या असहाय्य महिलेने दात पडक्या आप्पाला अद्दल घडावी म्हणून काही जणांकडे मदत देखील मागितली. परंतु मदत मागितलेल्या काहींनी *दोन लाख घेऊन गप्प बस, तो मोठा पैसेवाला आहे, राजकारणी लोकांशी त्याचे संबंध आहेत.* असे सांगून गरीब महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती स्वतः त्या महिलेने दिली. *पोलिसांशी देखील त्याचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे पोलिसात तक्रार देऊनही काही फायदा नाही* असा सल्लाही तिला देण्यात आला.

गैरधंदे करणारे आप्पा सारखे असे कितीतरी नराधम समाजात आहेत जे गोरगरीब महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांची बदनामी करून मानसिक छळ करतात. दात पडक्या आप्पाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून ती महिला शेवटी उद्या महिला दक्षता समितीला भेटणार  असून दात पडक्या आप्पाच्या करतुदींचा पाढा वाचून आपल्याला न्याय मिळण्यासाठी लढा देणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा