You are currently viewing गीतरामायणाधारित नृत्य रचना सादरीकरण

गीतरामायणाधारित नृत्य रचना सादरीकरण

*गीतरामायणाधारित नृत्य रचना सादरीकरण*

निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी)
श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने निगडी व चिंचवड येथील राम मंदिरात दिनांक 25 मार्च शनिवार व दिनांक 30 मार्च गुरुवार या दोन दिवशी ” गीत रामायण गाण्यांवर नृत्य रचना” हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला .
” झंकार कथक नृत्य अकादमी ” या निगडी प्राधिकरण मधील नृत्य वर्गाच्या संचालिका सौ प्रगती ताई नाडगौडा आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी यामध्ये नृत्य रचना सादर केल्या.
67 वर्ष होऊन गेली तरी,गदिमा आणि बाबूजी यांचा कलाविष्कार असणाऱ्या व लोकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या गीत रामायण वर नृत्य सादर करणे आणि त्यातून राम कथा उलगडणे हा एक वेगळा प्रयोग आहे व विद्यार्थिनींना रंगमंच सादरीकरणाची संधी या नृत्य सेवेतून मिळते असे संचालिका सौ प्रगती ताईंनी सांगितले.
‘ झंकार नृत्य अकादमीच्या’ निगडी आणि रावेत येथे शाखा असून प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या विद्यार्थिनी येथे नृत्याचे धडे घेतात.
या दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ संपदा पटवर्धन यांनी आपल्या ओघावत्या शैलीतून केले .
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करून त्यानंतर राम जन्माला ,स्वयंवर झाले सीतेचे,सेतू बांधा रे,नकोस नौके तोडीता फुले मी या सारख्या गाण्यांवर बहारदार नृत्य रचना सादर झाल्या.
कार्यक्रमाची सांगता ‘नादातूनी या नाद निर्मितो या सुप्रसिद्ध भजनाने झाली. आणि समस्त श्रोते राम नामात तल्लीन होऊन गेले.
श्रीराम सेवा मंडळ निगडी व श्रीराम मंदिर देवस्थान चिंचवड यांनी सेवेची संधी दिल्याबद्दल प्रगती ताईंनी त्यांचे आभार व्यक्त केले

प्रतिक्रिया व्यक्त करा