You are currently viewing रामनवमीनिमित्त सावंतवाडीत शोभायात्रा

रामनवमीनिमित्त सावंतवाडीत शोभायात्रा

सावंतवाडी

रामोत्सवानिमित्त ३० मार्चला श्रीरामनवमी दिवशी विश्व हिंदू परिषद प्रखंड यांच्या पुढाकाराने ‘सकल हिंदू संस्थांनी’ विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष अजित फाटक, चिन्मय रानडे, प्रकाश रेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी प्रथेप्रमाणे १२ वाजता रामजन्मोत्सव श्री देव नारायण मंदिर येथे नियोजित केला आहे. दुपारी ४ वाजता सावंतवाडी शहर परिसरातील हिंदू बांधव व हिंदू संस्थांची शोभायात्रा आयोजित केली आहे. शोभायात्रेचा मार्ग श्री देव नारायण मंदिर येथून निघून मुख्य रस्त्याने नगरपालिका- रामेश्वर प्लाझा- मिलाग्रीस चर्च कोपरा – जयप्रकाश चौक- गांधी चौक- उभा बाजार चितार आळी या मार्गाने परत नारायण मंदिर असा असेल. शोभायात्रेत ढोलपथक, वारकरी मंडळी, शाळेतील मुलांचे लेझीम पथक, विविध हिंदू संस्थांची पथके, चित्ररथ, रामायणातील विविध पात्रे सजीव स्वरुपात सहभागी होतील. रामाची पालखी / रथ, मुलांचे कार्यक्रमअशा आकर्षक पध्दतीने शोभायात्रा निघेल. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांना दर्शन, पूजा याचीही सोय केली आहे.
श्री देवनारायण मंदिर परिसरात स्टेजवर शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर गीतारामायण व ‘भक्ती- प्राबल्य’ ही श्रीरामावर आधारित दशावतारी नाटके होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =