– सहायक आयुक्त संतोष चिकणे
सिंधुदुर्गनगरी
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाकडून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात मुलांकरीता एक व मुलींकरीता एक असे दोन वसतीगृह तातडीने सुरु करावयाचे आहे. या वसतीगृहाकरीता खासगी इमारत भाडे तत्वावर घेण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तरी इमारत मालक भाडेतत्वार इमारत देण्यात इच्छुक असतील अशा इमारत मालकांनी अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
मुलां- मुलींसाठी 100 क्षमतेच्या खासगी इमारतीमध्ये आवश्यक जागा 9200 चौ.फुट (अंदाजे) असणे आवश्यक आहे. इमारतीमध्ये स्वंयपाकगृह, भोजनकक्ष, मनोरंजन हॉल, संगणक कक्ष, स्टोअर रुम, कार्यालय, अभ्यासिका व स्वच्छतागृहे 10, स्नानगृहे 10 या सर्व बाबी करीता अंदाजित 92 चौ.फुट बांधकाम पुर्ण असलेल्या इमारतीमध्ये सर्व सोयी- सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. इमार ही जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी किंवा कुडाळ, कणकवलील शहराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.