You are currently viewing मुंबईचं एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय बंद करण्याचं कारण काय?

मुंबईचं एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय बंद करण्याचं कारण काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांसारख्या मातब्बरांच्या शिक्षणाची साक्षीदार संस्था*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठी शाळा वाचवा अभियाना अंतर्गत, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई. या पूर्णतः मराठी शाळेला लागलेली अखेरची घरघर कमी करुन शाळा पूर्ण विद्यार्थी संख्येने चालू व्हावी यासाठी माजी विद्यार्थी कार्यकारीणी सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची सदिच्छा भेट घेतली. ह्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीत शाळेच्या भूत, वर्तमान आणि भविष्य विषयक महत्त्वपूर्ण बाबींचा सखोल आढावा घेतला.

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या शाळेतून शिकून मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या आहेत. याची जाणीव ठेऊन या बैठकीत सक्रिय माजी विद्यार्थी सदस्यांनी शाळेच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे प्रश्न विचारले.

१८७२ साली सुरू झालेली मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही १५० वर्षे जुनी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या शाळेचा बहुतांश भाग शासकीय तसेच अशासकीय आस्थापनांच्या कार्यालयीन कामांकरिता वापरला जात आहे. शाळेच्या इमारतीमधील इतर शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित करावी आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ विविध नवीन तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करून या शाळेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी सक्रिय माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकांसोबत चर्चा करण्यासाठी दिलीप शिंदे, किर्ती जाधव, संजय सावंत, गंगाराम मेडसरे, बाळकृष्ण नाणेकर, मिलिंद मिरजकर, राजु कांबळे, रमेश हंकारे, विनोद जठार, निशिकांत महांकाळ, सुभाष पावसे, अॅम्रोज सोज आणि प्रसाद आंबेरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरात लवकर भेटण्याचे ठरविले व शाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करत राहण्याचा दृढनिश्चय केला. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्र्यांना याबाबत यापूर्वीच निवेदन सादर करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक बडय़ा व्यक्तींनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. अशी नामवंत शिक्षण संस्था अखेरची घटका मोजत असल्यामुळे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व्हॉट्सॲप क्र.98924 70137/93204 34916/98692 72057 किंवा 93221 23001 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा