You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सव…!

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सव…!

संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 ते 10 एप्रिल दरम्यान आयोजन

कणकवली

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे. यात 7 एप्रिल रात्रौ 6 वाजता
आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित,
गणपत घाणेकर आणि सहा. दिग्दर्शक सुहास
वरुणकर दिग्दर्शित दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो, 8
एप्रिल रोजी सायं. 6 वाजता चेंदवणकर दशावतार
नाट्यमंडळ यांचे रक्तजल डोहाळे, रात्रौ 9 वाजता
कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे अर्धशिरा, 9
एप्रिल सायं. 6 वाजता जय हनुमान दशावतार
नाट्यमंडळ यांचे वरुण देव गर्वहरण, रात्रौ 9 वाजता
चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचे कृष्ण
पूजन, 10 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता वालावलकर
दशावतार नाट्यमंडळ यांचे बालभूवनेश्वर, रात्रौ 9
वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचे
कुर्मादासाची वारी या दशावतारी नाट्य प्रयोगांचे
आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा