You are currently viewing फळपिकासह भात धान्याची विमा रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी…

फळपिकासह भात धान्याची विमा रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी…

तुळस येथील आंबा काजू बागायतदार संघटनेची मागणी; अन्यथा आंदोलन करू…

वेंगुर्ला

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१ नुकसान भरपाई प्रति हेक्टरी तफावतीची रक्कम तसेच इको-टोर्किया जनरल इन्शरन्स २०२०-२१ मध्ये भात धान्याची विमा रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणी तुळस गावातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेतर्फे वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. ११ मे पर्यंत उपययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा,आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेने दिला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस व होडावडा गावांतील शेतक-यांनी वारंवार पत्रव्यवहार करुनही एचडीएफसी विमा कंपनीने अद्यापपर्यंत विमा तफावत रक्कम जमा केलेली नाही. सन २०१९-२० अखेरपर्यंत ही गावे महसुल मंडळ वेंगुर्ला अंतर्गत या योजनेकरिता समाविष्ट होती. सन २०२०-२१ करिता सिधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने १८ महसुल मंडळाची निर्मिती झाली. ही नवनिर्मिती मातोंड महसुल २०२०-२१ करीता जाहीर झाली. प्रति हेक्टरी नुकसान भरपाई ही देखील महसुल मंडळ शिरोडा प्रमाणेच मिळणे आवश्यक होती. परंतु, तुळस व होडावडा येथील शेतक-यांना महसुल मंडळ वेंगुर्ला प्रमाणेच प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली असल्यामुळे विमा कंपनीला अनेकवेळा पाठपुरावा करुन सुद्धा अद्यापपर्यंत विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

मातोंड महसुल मंडळाप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी १ मे रोजी उपोषणही केले. यावेळी तोंडी आश्वासन देण्यात आले. परंतु, ११ मे पर्यंत तफावत रक्कम जमा न झाल्यास १२ मे रोजी आंदोलनाचाही इशारा या आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या निवेदनावर आंबा व काजू विचार मंचचे सदस्य शामसुंदर राय, विठ्ठल आरोसकर, रामचंद्र पवार, दत्तात्रय मराठे, लाडू परब, गंगाराम परब, सुभाष भगत, गोविद भणगे, पुरुषोत्तम भणगे, मोहन सावंत, यशवंत सावंत, जयवंत सावंत, विश्राम सावंत, भुषण सावंत, जयानंद सावंत, प्रदिप सावंत, लाडू परब, श्रीकृष्ण आमडोस्कर, प्रविण नाईक यांच्या स्वाक्ष-या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा