You are currently viewing मालवणात युवती सेनेकडून आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस दणक्यात ; छोट्या आमदारांनी कापला केक 

मालवणात युवती सेनेकडून आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस दणक्यात ; छोट्या आमदारांनी कापला केक 

मालवण

आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालवण मधील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस रविवारी दणक्यात साजरा करण्यात आला. युवती सेनेच्या वतीने भरड नाका येथे ढोल ताशांच्या गजरात केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवस सोहळ्याचे शिवसैनिक आणि नागरिकांतून कौतुक केले जात आहे.

आमदार नाईक यांचा वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यात युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून भरड नाका येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आमदार नाईक यांचा वाढदिवस ढोल ताशांच्या गजरात, छोट्या आमदाराच्या भूमिकेत अधिराज खानोलकर, तनिष्का खोत यांच्यासह अन्य बालचमुंच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भरड नाक्यावर लावण्यात आलेला भावी पालकमंत्री हा बॅनर लक्षवेधी ठरला होता.

यावेळी कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख शिल्पा खोत, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, भाई कासवकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, उपतालुका प्रमुख रूपा कुडाळकर, रूपा कांदळकर, आर्या गावकर, प्रतिभा चव्हाण, वैभवी चौकेकर, दिया पवार, दीपा पवार, निकिता तोडणकर, साक्षी पार्टे, मानसी घाडीगावकर, साक्षी मयेकर, कल्पिता जोशी, मिनिष चव्हाण, कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव उपसरपंच दिव्या परब, युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, अमर सरमळकर, राजेश शेडगे, अनुष्का परब, आशालता परब, साक्षी कांदळकर, हर्षदा पाटकर, प्रियांका परब, सृष्टी चौकेकर, दशरथ गावकर, प्रज्ञा कदम, रुजाय फर्नांडिस, पॉली गिरकर, चेतन तळाशीलकर, मनस्वी कदम, हर्षल केळुसकर, श्रीकांत मालवणकर, शुभम पाटील, शुभ्या पाटील, पूजा तळाशीलकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा