You are currently viewing ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक व स्त्री शक्ती मंच संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन.

ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक व स्त्री शक्ती मंच संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन.

पुणे

दिनांक १९/०३/२०२३ रविवारी संभाजीनगर येथे ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक व स्त्री शक्ती मंच संभाजीनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथे श्री.चंद्रकांत तायडे व श्री. खोडे सर यांच्या अथक परिश्रमातून व महिलांचे कौतुक झालेच पाहिजे या प्रेरणेतून शंभर महिलांनी लिहिलेल्या कविता संग्रह ‘ घे भरारी ‘ याचे प्रकाशन या दिवशी करण्यात आले.
या पुस्तकात कवयित्री वसुधा नाईक यांच्या दोन कविता आहेत. कार्यक्रमात त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच श्री.चंद्रकांत तायडे या अवघ्या २४ वर्षाच्या मुलाच्या ‘प्रकाशाच्या वाटा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक मराठीतून १ मे २०२२ रोजी प्रकाशित झाले होते. १९ तारखेला तब्बल चार भाषेमध्ये अनुवादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन केले गेले. अवघ्या २४ व्या वर्षांमध्ये चंद्रकांत ने घेतलेली ही भरारी,नक्कीच त्याच्या पुढील जीवनामध्ये उंच भरारी होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये महिला विश्व अंक प्रसिद्ध करण्यात आला. त्याचबरोबर स्वयंसिध्दा पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. महिला विश्व हा पुरस्कार, सन्मान देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष होते सौ. प्रतिभाताई इंगोले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोडे सरांनी केले. पूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सुरेखा शिरसाट यांनी केले.
श्री. चंद्रकांत तायडे आपल्या भाषणात असे म्हणाले की, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. आत्मविश्वासाने केलेल्या कामाला कसलीच भीती नसते. महिलांचे कौतुक झालेच पाहिजे या प्रेरणेतून मी आजचा हा कार्यक्रम स्पेशल महिलांसाठी केलेला आहे. शंभर महिला एकत्र आणून त्यांचे घे भरारी हे पुस्तक तयार केले. सर्व महिला वर्गांनी मला उत्तम साथ दिली.
प्रत्येक आलेल्या व्यक्तीचा चंद्रकांत ने खूप छान सन्मान केला.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बऱ्याच महिला उपस्थित होत्या.

वसुधा नाईक, पुणे
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

प्रतिक्रिया व्यक्त करा