ग्रामपंचायत नावळेच्या वतीने जिल्हा परिषद विद्या मंदिर नावळे धनगरवाडा प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू..

ग्रामपंचायत नावळेच्या वतीने जिल्हा परिषद विद्या मंदिर नावळे धनगरवाडा प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू..

वैभववाडी

ग्रामपंचायत नावळेच्या विलगीकरण कक्ष जिल्हा परिषद विद्या मंदिर नावळे धनगरवाडा प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत नावळे येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर नावळे धनगरवाडा प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. या कक्षाचा शुभारंभ सरपंच सौ स्नेहा शेळके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त करत असताना गावागावात असे कक्ष उभारण्यास व यातील सोयी सुविधा वाढवण्यासाठी दात्यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा सर्वांनी मिळून कोरोनाशी लढलो तर विजय नक्कीच आहे.

या कशाच्या उभारणीसाठी सरपंच सौ स्नेहा शेळके, महेश रावराणे, संजय शेळके, दिगंबर गुरव, रमेश गुरव, वैशाली गुरव, ग्रामसेवक अनिल घुगे, आरोग्य सेवक शिवाजी बोडेकर, कृषी सहायक मसेकर,तलाठी माळी मॅडम,नराम मॅडम, सौ रावराणे, सौ इदप, आदींनी मोलाची साथ दिली.

या कक्षाच्या शुभारंभप्रसंगी प्रसंगी उपसरपंच दत्ताराम गुरखे, सदस्य महेश रावराणे, दिगंबर गुरव, रमेश गुरव, तलाठी माळी मॅडम, आरोग्य सेवक शिवाजी बोडेकर,आशा सेविका सौ साक्षी शेळके, ग्रामसेवक अनिल घुगे कृषी सहायक मसेकर,सावंत सर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा