You are currently viewing कसाल हायस्कूल येथे आरोग्य विषयक जागृती कार्यक्रम संपन्न

कसाल हायस्कूल येथे आरोग्य विषयक जागृती कार्यक्रम संपन्न

कसाल :

 

कसाल हायस्कूल येथे कसाल ग्रामपंचायत व राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण पंधरवडा बालकांच्या आरोग्य विषयक जागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कसाल सरपंच राजन परब, उपसरपंच शंकर परब, ग्रामपंचायत सदस्य गणपत कसालकर, ग्रामविकास अधिकारी एस बी कोकरे, बालम मॅडम, डॉक्टर दर्शना कोलते, डॉक्टर अर्चना चिवडे अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

यावेळी किशोरवयीन मुलींना, कसाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर दर्शना कोलते व डॉक्टर अर्चना चिवडे यांनी किशोरवयीन मुलींनी घ्यावयाची काळजी, आहार, आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 18 =