You are currently viewing मालवण समुद्रकिनारी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ

मालवण समुद्रकिनारी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ

मालवण :

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीसाठी माविमने चार दिवस व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. अशा प्रदर्शनामधून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास निश्चित प्रयत्न होणार आहेत. असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प (नवतेजस्विनी अंतर्गत) माविम बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ आजपासून मालवण येथे करण्यात आला आहे. जेटी बंदर, मालवण बीच येथे हे प्रदर्शन २७ मार्च पर्यंत असणार आहे.

माजी नगरसेवक दीपक पाटकर, श्री. दिवेकर आणि उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, तसेच थोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे, मालवण नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी महेश परब, मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) जिल्हा समन्वयक लक्ष्मण खुरकुटे, स्वराज्य संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत तसेच हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, (कणकवली), सिंधूकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा- (मालवण), स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र (कुडाळ), माहेर लोकसंचलित साधन केंद्र (सावंतवाडी), अन्नपूर्णा लोकसंचलित साधन केंद्र (देवगड) यांचे अध्यक्ष तसेच सभासद उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, आजपासून सुरू झालेले हे प्रदर्शन बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक प्रकारचे दालन माविमने खुले आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराबरोबरच कृषी पुरक व्यवसाय करायला हवेत. अनेक प्रक्रीया उद्योगाच्या माध्यमातून चांगले उत्पन मिळू शकते. त्यावर भर द्यावा. सात्यत्याने बदल आणि नवे प्रयोग करायला हवेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांची क्षमता, महिलांचा आत्मविश्वास आणि उद्योजक वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे प्रस्ताविकात म्हणाले, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा एक अंगीकृत उपक्रम आहे. २४ फेब्रुवारी १९७५ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे, महिलांना उद्योजक बनविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा प्रमुख ‘माविम’चा उद्देश आहे. तसेच राज्य शासन पुरस्कृत महिलांसाठीच्या विविध विकासात्मक योजनांकरिता राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून माविम कार्यप्रणालीचे स्वरूप आहे. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, विशेष घटक योजना, तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना, वॉटर ऑर्गनायझेशन, नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्योग उद्यम विकास कार्यक्रम, तेजश्री फायनान्स, मानव विकास मिशन, शिवभोजन, नाबार्ड ई-शक्ती, ई- कॅटरींग योजना तसेच उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

भविष्यात सर्व नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत सर्व सीएमआरसीना सब प्रोजेक्ट काजू, आंबा, कोकम, नारळ, सुपारी, मध, पशुपालन, मत्स्य क्लस्टर उद्योग सुरू करणे, लक्ष्मीपुर्ती व घर दोघांचे अभियान, विकेल ते पिकेल या धर्तीवर उपक्रम राबवणे, परसबाग शेतीची अंमलबजावणी, महिलांच्या आरोग्यसाठी हिमोग्लोबिन कॅल्शियम रक्तगट व असंसर्गीय आजारांना घडण्यासाठी जागृती करणे, कृषी आणि अकृषी व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे ही उद्दिष्ट्ये आहेत.

सध्या जिल्ह्यात माविमची प्रगती उल्लेखनीय असून एकूण ७४३ ग्रामीण तर ६८ वॉर्ड या भागात कार्यक्षेत्र सुरू आहे. तर बचतगटमध्ये ग्रामीण भागात १ हजार १५ आणि शहरी भागात २७५ अशी संख्या असून यामध्ये एकूण महिला ११ हजार ६७ तर शहरी भागात २ हजार ८५९ महिला माविमच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. असेही ते म्हणाले.

*महिला बचत गटांना आवश्यक ती सर्व मदत- निवासी उपजिल्हाधिकारी* 

निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी ऑनलाईन सहभाग घेवून या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सहकार्य करत असते.यापुढेही निश्चितच त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. जिल्ह्याला अग्रेस ठेवण्यासाठी महिला बचत गटांचे काम कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सिंधूकन्या लोकसंचलीत साधन केंद्र कट्टाच्या संयोगीनींच्या स्वागत गीतांनी झाली. त्यानंतर स्वराज्य ढोल पथकांने ढोल वादन केले. रोहन नाईक यांनी सुत्रसंचालन केले. सिंधूकन्या लोकसंचलीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक गिता चौकेकर यांनी सर्वांचे आभार मानले. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर नृत्य, भजन तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लेखाधिकारी आशालता जमने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

 

*संवाद मिडिया*

 

*न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠च्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 खास ऑफर”…!*

 

*सविस्तर वाचा👇*

—————————————————-

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

*मळगाव-कुंभार्ली🏕️* येथील ️ *रेरा ॲक्ट📜* नुसार *मान्यता📃* असलेल्या *न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠* यांच्या *”रेन्बो हिल्स🌈”* मध्ये *ग्राहकांसाठी🥰* आम्ही देतोय खास *”गुढीपाडवा ऑफर”…!🚩💥🤩*

 

*🔹सॅम्पल रेडी*

*🔸गृह कर्जाची सुविधा*

*🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!*

 

*🛑रेरा नं. P52900022211*

 

*_फक्त ५१ हजारात बुकिंग💰 करा, सोबत स्टॅम्प ड्युटी 🏷️ आणि 🤩 रजिस्ट्रेशनसह जीएसटी फ्री मिळवा…!🤟_*

 

👉तात्काळ *बुकिंग📃* केल्यास अजून *५० हजाराची💰* सवलत…!तर *ऑफर फक्त पुढील १० दिवसांसाठी🗓️* मर्यादित…!

 

*🏚️New Max Developers🏘️*

*यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प*

*🌈”रेन्बो हिल्स”🏞️*

 

*🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-*

👉1RK १३लाखात

👉1BHK १६ लाख३५ हजारात

👉2 BHK २३ लाखात

 

*_मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖_*

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

*🏡आमचा पत्ता:-*

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*📲संपर्क:-*

9653693804 / 8104829770

 

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा