बांदा
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२२-२३या उपक्रमांतर्गत Exposure visit outside state या सहलीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या २०विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गुजरात राज्यातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आयोजित करण्यात आला असून या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे शुभेच्छा देण्यात आल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे , उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. २४ते २९मार्च या कालावधीत या अभ्यास दौऱ्यात गुजरात राज्यातील अहमदाबाद, वडोदरा अशा विविध स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.
या अभ्यास दौऱ्यासाठी ज्या शाळा जास्त प्रगत झालेल्या आहेत व ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती सर्वोत्तम आहे अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये तालुकावार पुढील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे देवगड -संस्कृती गुरव इळये नं.१, पार्थ दहिबावकर शाळा दहिबाब,रिषभ पाळेकर पाळेकरवाडी नं१.
दोडामार्ग-सानिका गवस मांगली नं.१,सुरज नाईक सासोली नं १. कणकवली-आदिती रासम हळकुळ खुर्द,अन्वय शेटये खारेपाटण नं१,तपस्या दळवी हरकुळ खुर्द गावडेवाडी. कुडाळ-सांची पाटेकर ओरस बुद्रुक,किरण कदम पडवे नं१.मालवण.चैतन्य भोगले मसुरे नं.१ ,प्रज्ञा मेस्त्री निरवडे.सावंतवाडी-तनिष्का राणे इन्सुली नं२,अमोघ वालावलकर केंद्र शाळा बांदा नं.१,शमिका कदम कुणकेरी नं१ .वैभववाडी-श्रृती शिंदे कुंभवडे नं.१,दुर्गेश तावडे खांबाळे नं.१.वेंगुर्ला-मनाली परब वजराट नं.१,सार्थक जामदार वेतोरे नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी निवडण्यात आले असून या विद्यार्थ्यांच्या सोबत खारेपाटण शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदिप प्रदिप श्रवणकर ,बांदा केंद्र शाळेचे उपशिक्षक जे.डी.पाटील, ओरोस बुद्रुक शाळेच्या शिक्षिका संगिता पाट्येकर हे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हे नेहमीच गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर राहिले असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन यासाठी राबविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे तसेच उपस्थित शिक्षक व पालक यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी केले.