*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वागत नविन वर्षाचे…*
नव वर्षाचे करू या स्वागत हसून सामोरे
येणारे ते वर्ष असते, नसते काळे गोरे …
वर्ष म्हणजे काळ आहे हाती कुणाच्या आला ?
सुखकर झाला कधी कुणाला कधी वैरी झाला…
जे नाही हो आपुल्या हाती स्वीकार्यच मानावे
मार्ग तयातून कसा काढावा सुज्ञांनी जाणावे…
कष्टाला उत्तम फळ येते सर्वज्ञात आहे
दोष नसे हो कोणाचा ही वेठीस का धरावे.?
संकल्प करू या नवे, झोकून स्वत:ला देऊ
कष्टांचे ते फळ रसाळ हो आनंदाने खाऊ…
कष्ट न करता फळ ना मिळते दारिद्र्य येते
दोषारोप करून कुणावर सांगा काय मिळते?
आळस आहे शत्रू मोठा हो थारा नका देऊ
हात पाय हलवा जोमाने पैलतीरी जाऊ…
संकल्पांना जोड सिद्धिची सत्वर देऊ चला
येणारे ते वर्ष कोणते? म्हणू नका हो”बला”…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २३ मार्च २०२३
वेळ : सकाळी ९/४६
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————