सावंतवाडी
आरोस-माऊलीवाडी येथील जंगलात ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेणाऱ्या कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थी चेतन कोरगावकर याला शैक्षणिक मदतीसाठी उमेद फौंडेशनने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. चेतन कोरगावकर याच्या निवासस्थानी जाऊन त्याला रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.
चेतनच्या संघर्षमय शैक्षणिक घडपड ची माहिती उमेद फाऊंडेशन ला मिळाली हा मुलगा ‘कर्णबधिर असुधही जंगलात जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत असल्याचे उमेद संस्थेने पाहीले होते. या धडपड करण्यात त्याची जिद्द पाहून उमेद फौंडेशनने दखल घेत सावंतवाडी तालुक्याचे प्रमुख सहाय्यक शिक्षक जे. डी. पाटील, शिक्षिका स्वाती पाटील यांनी आरोस येथे चेतनच्या घरी जात त्याच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती घेतली.
चेतन हा कर्णबधिर व मूकबधिर असून त्याची शिक्षण घेण्याची जिद्द ही कौतुकास्पद आहे. तो दररोज १६ किलोमीटरची पायपीट करत जंगलात नेटवर्क शोधून आपला दैनंदिन अभ्यास ऑनलाईन करतो. तो पुणे येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. त्याची घरची परिस्थिती हलाखीची असून शिक्षण घेण्यासाठी व महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी त्याने गवंडी काम व रंगकाम करून पैसे गोळा केले आहेत. उमेद फौंडेशनचे जे डी पाटील यांनी सांगितले की, चेतनला आर्थिक मदत प्राथमिक टप्प्यासाठी देण्यात आली आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी उमेदच्या वतीने निश्चितच प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी चेतनचे वडील झिलु कोरगावकर, आई आनंदी कोरगावकर उपस्थित होते.