*ओंजळीतील शब्दफुले, रणरागिणी साहित्य समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम लेख*
*पत्रास कारण की…*
आपले विचार आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीला लिहून कळवण्याचे माध्यम म्हणजे पत्र होय. पत्राद्वारे अर्धी भेट झाल्याचा आनंद व्हायचा. मला लिपी गिरवता आल्यानंतर, पत्र म्हणजे काय हे कळत नव्हते म्हणजे साधारण तिसरीत असल्यापासून पत्रलेखन करावे लागले. याचे कारण म्हणजे, आमच्या नातेवाईकांपैकी, आमची मावशी लग्न होऊन, प्रथमच एवढ्या लांब म्हणजे मुंबईला आली. आईला तिच्याशी संवाद साधायचा असे तो ती माझ्याकडून पत्राद्वारे लिहून घेई . माझ्या नासिक येथे राहणाऱ्या मामांना पत्राद्वारे राखी पाठवली जायची. नागपूरला शिकणाऱ्या माझ्या काकांना ख्यालीखुशाली विचारत सद्ववर्तणुकीचे धडे देणारी पत्रे आई ,आजी माझ्याकरवी लिहून पाठवायच्या. पत्रातून विविध भावभावना व्यक्त व्हायच्या . आनंदलहरींबरोबर विरहव्याकुळतेने नयनातून मोत्यांची माळ पत्रावर घरंगळायची. क्वचित प्रसंगी अमक्यातमक्यांना देवाज्ञा झाली हे कळवताना अर्ध पत्र मनाला, हृदयाला पाझर फोडायचं….! अशाप्रकारे कौटुंबिक पत्रलेखनाची खरी ओळख करून देऊन व सराव करून घेतला तो माझ्या प्रथम गुरूने म्हणजे माझ्या आईने व आजीने! आज विचार करताना, त्या पत्रांतले भाव त्यांचे होते पण शब्दलेखन माझे होते. पत्रलेखक आणि वाचक म्हणूनही माझी खरी सुरुवात इथून होती!
आमच्या लहानपणी, आपले आप्तेष्ट, आपले मित्र दुसऱ्या गावी रहात असतील तर त्यांच्याशी पत्र पाठवून अशाप्रकारे संपर्क साधला जात असायचा. पत्रलेखन ही प्रत्येकाच्या जीवनातील अत्यावश्यक बाब होती. आजही पत्रलेखन महत्त्वाचे आहेच. पण औपचारिक पत्रलेखन सोडल्यास, नवनवीन तंत्रज्ञानाच्या साधनांवर होणारे हे पत्रलेखन हे सध्या *संदेश* रूपाने होत असते. तरीही पूर्वीची ती पोष्टाची पेटी व पोष्टमनकाका यांचे महत्त्व आजही, अजूनही टिकून आहे.
पत्र हे अप्रत्यक्ष संभाषणच असते. पत्रलेखक प्रत्यक्ष आपल्याशी बोलतो आहे असे ते वाचणाऱ्याला वाटत असते म्हणूनच सहज सोप्या भाषेत सुटसुटीत वाक्यात पत्र लिहायचे असते. ज्याला पत्र पाठवायचे त्याच्याशी जवळिक साधली जाईल असे पत्र लिहावे लागते. पत्र लिहिण्यास आरंभ केला की ते एक टाकी अन खाडाखोड न करता लिहिले म्हणजे वाचणाऱ्याला ते पटकन समजते आणि आनंदही देते. पत्रात जो मजकूर लिहायचा असेल त्याचा विचार आधीच करून ठेवावा लागतो म्हणजे पत्र लिहिताना आपण न अडखळता सलग लिहू शकतो. पत्रातील मजकूर सुस्पष्ट व नि:संदिग्ध भाषेत लिहिलेला असेल तर वाचणाराला आपल्या मनातील आशय चांगल्या रीतीने व ते वाचता क्षणीच समजतो. पत्रात शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात व पत्र सुवाच्य अक्षरात, टापटीपीने लिहिलेले असावे. ते समास सोडून लिहावे. पत्रात आपले म्हणणे थोडक्यात नेटकेपणाने मांडावे. उगाच पाल्हाळ लावू नये व विचारांची पुनरुक्ती करू नये….इत्यादी पत्रलेखनासंदर्भातील आवश्यक महत्त्वाच्या बाबी शालेय अभ्यासक्रमातून यथावकाश समजत गेल्या. पत्राचा मायना, त्यातील संबोधने, विषयमांडणी, समारोप सुयोग्य व्हावा याबाबत आमचे शिक्षक खूप सजगतेने व बारकाईने मार्गदर्शन करीत असत. लाल शाईचं पेन वापरण्यास कधी कुचराई नसे!
जीवनात आपल्याला अनेक प्रकारचा पत्रव्यवहार करावा लागतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, आप्तेष्टांना, मित्रांना आपण वेळोवेळी पत्र लिहितो. पण व्यवहाराच्या निकडीनेही आपणास निरनिराळी पत्र लिहावी लागतात. काही पत्रे व्यवसायाच्या निमित्ताने लिहावी लागतात. कार्यालयीन पत्रे हा आणखीन एक वेगळा प्रकार असतो. आप्तेष्टांना लिहावयाची पत्रे आणि व्यवहारिक पत्रे या दोन्ही प्रकारच्या पत्रलेखनाचा सराव आपल्याला शालेय शिक्षणात दिलेला असतो. तरीही उत्तम पत्रलेखन करता येणं ही एक उत्तम कलाकृती तयार करण्याइतकीच महत्त्वाची कला होय. ती ज्याने त्याने आपल्यापरीने सादर करावी!एखाद्यावेळी पत्राचे काम दूरध्वनीवरून संवाद करून होते पण तरीही दप्तरी नोंदणीसाठी हाताने पत्र लिहण्याचा आळस टाळलेला बरा . सध्या तर संगणक, भ्रमणध्वनीवर पत्र टंकित करण्याची छान सोय आहे! काही दिवसांचे काम काही क्षणात होऊ लागले आहे हे छानच आहे . तरीही उन्हातान्हात, पाणीपावसात अनेक कि.मी.ची पायपिट करीत घरोघर पत्र, बिले, पावत्या, प्रमाणपत्रे, मनिऑर्डर, तारा घेऊन येणारे ते टपाल काका, त्या लाल टपालपेट्या, टपालगाड्या, ती अपुऱ्या सोयी असलेली, अपुऱ्या कर्मचारी वर्गाची टपाल कार्यालये या सर्वांचे उपकार व महत्त्व आपण कधी विसरू शकत नाही व विसरूही नये!
पुष्पा कोल्हे
चेंबूर मुंबई 71
दि.13/11/2022
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
_______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-