You are currently viewing चिवला बीच हायमास्ट टॉवरचा जीर्ण व धोकादायक बॉक्स  माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून  बदलला

चिवला बीच हायमास्ट टॉवरचा जीर्ण व धोकादायक बॉक्स  माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून  बदलला

मालवण नगरपालिकेची कार्यवाही ; नागरिकांनी मानले पाटकर यांचे आभार

मालवण

मालवण शहरातील चिवला बीच येथील हायमास्ट टॉवरचा जीर्ण बनलेला व धोकादायक स्थितीतील बॉक्स माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवण पालिकेच्या वतीने बदलण्यात आला आहे.

चिवला बीच येथील या हायमास्ट टॉवरचा बॉक्स जीर्ण बनल्याने नागरिकांच्या अपघाताची स्थिती होती. मागील वर्षभर हा बॉक्स बदलण्याची मागणी येथील नागरिक करीत होते. याबाबत येथील नागरिकांनी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दीपक पाटकर यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा बॉक्स बदलण्यात आला आहे.

पाटकर यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जॉन्सन रोड्रिक्स, राज कांदळकर, आनंद मयेकर, सुभाष कुमठेकर, प्रणाली कांदळकर, प्रशांत कांदळकर, अमोल परब, पावलू सोज, कैतान सोज,
अंतोंन फर्नांडिस आदी उपस्थित होते. या कामाची पूर्तता झाल्याबद्दल नागरिकांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 10 =