You are currently viewing कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती

कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती

कुडाळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आली प्रसिद्धी व प्रसार

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून प्रसार व प्रसिद्धी करण्यात आली. हा कार्यक्रम विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चेतन गंगावणे यांनी सादर केला.

सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या विविध योजना या अनुसूचित जाती, जमातीच्या नागरिकांना समजाव्यात त्याची प्रसिद्धी आणि प्रसार व्हावा म्हणून जिल्हा माहिती कार्यालय यांनी लोककलेच्या माध्यमातून या योजनेची प्रसिद्धी व प्रसार करण्यासाठी पिंगुळी येथील विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट यांना जबाबदारी दिली. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिरामध्ये या योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर झाला. यावेळी विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चॅरिटेबल ट्रस्टचे चेतन गंगावणे यांचे स्वागत कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक तथा भाजपचे गटनेता विलास कुडाळकर यांनी केले. शासनाच्या विद्यार्थ्यांपासून घरकुलापर्यंत असलेल्या योजनांची माहिती या लोककलेतून देण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कुडाळकर, नितेश कुडाळकर, प्रणव कुडाळकर, साहिल कुडाळकर, सौ अनिता कुडाळकर, शारदा कुडाळकर, दर्शना कुडाळकर, शुभांगी जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा