You are currently viewing मुख्य बाजारपेठेत किराणा दुकानाला आग….

मुख्य बाजारपेठेत किराणा दुकानाला आग….

कणकवली

कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजता अचानक आग लागली आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले. दरम्यान या ठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला. मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनतर दिलीप बिल्डकाँनचा पाण्याचा टँकर बोलावून त्यातील पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान दिलीप बिल्डकाँनचा पाण्याचा टँकर बोलवण्यात आला. तेव्हा तो टँकर शिवाजी चौक येथे नगरपंचायत कर्मचारी यांनी अडवत त्यातील पाणी अग्निशामक बंबामध्ये घेतले जात होते, त्यावेळी संदेश पारकर यांनी आक्रमक होत असा वेळ काढू नका, ताबडतोब चला असे सांगितले. त्यानंतर ८.१० वाजता अग्निश्यामक बंब व दिलीप बिल्डकाँन पाणी टँकर आला. याद्वारे पाणी मारत आगीवर नियंत्रण अर्ध्या तासात आणण्यात आले.

घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रमेश पवार, शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, संजय कामतेकर, संजय मालांडकर, सर्वेश शिरसाठ, मेघा गागण, अण्णा कोदे, राजू गणपते, बंडू हर्णे, विलास कोरगावकर, विशाल कामत, चेतन अंधारी, सुशील पारकर, मंदार सापळे, महेश गुरव, बंडू गागण, सुजित जाधव, अनिल हळदिवे, संदीप नलावडे, वैभव आरोलकर, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, टिंकू हर्णे, अनिल येडवे, शेखर गणपत्ये, प्रज्वल वर्धम, पांडु वर्धम, राजन पारकर, सुनील पारकर, तुषार कोदे व पोलीस विभागाचे उपनिरीक्षक बनकर, बाबर, प्रकाश कदम, पोलीस कैलास इमपाल, गुरव,कोळी, वाहतूक पोलीस सुरेश शेडगे, संदेश आंबिटकर, वावरे आदी उपस्थित होते.
नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, मिथुन ठाणेकर, गणेश लाड, विनोद जाधव व अन्य कर्मचारी व पोलीस, नागरिक बचाव करण्यासाठी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 17 =