चिपळुण ते राजापुर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा पुर्ण केल्यावर मुंबई गोवा हायवे च्या समस्या त्यात प्रामुख्याने संगमेश्वर शहरातील पुलाच्या भुसंपादनाच्या समस्या माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडल्या. संगमेश्वर वासीयांचे सह्यांचे निवेदन त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात दिले.
नुकताच चिपळुण ते राजापुर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा पुर्ण केला. सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत मुंबई गोवा हायवेच्या समस्या जास्त असल्याचे प्रमोद जठार यांनी निदर्शनास आणुन दिले .
संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांबऊन पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत अशी मागणी जनतेची असुन त्याचे निवेदन देण्या साठी आलो असुन त्यांना न्याय द्यावा. तसेच मुंबई गोवा हायवेचे जे कंत्राटदार निविदा मिळुन सुद्धा अजुनही काम सुरु करीत नाहीत त्यांची कामे त्वरित काढुन घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड लावावा व तो वसुल करुन जनकल्याणासाठी वापरावा अशी मागणी केली.
आपण सुद्धा आता त्यांच निष्कर्षास आलो असुन दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाई चा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत दिले व संगमेश्वर शहरवासीयांना सुद्धा न्याय देण्याचे मान्य केले.